अखिल भारतीय सरपंच परिषद (महा.राज्य ) धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी सुरेशआप्पा पाटील यांची नियुक्ती !

0

धरणगाव:- तालुक्यातील झुरखेडा येथील प्रथम पुरुष लोकनियुक्त सरपंच श्री. आप्पासो. सुरेश गोरख पाटील यांची अखिल भारतीय सरपंच परिषद (महा.राज्य ) धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी श्री. आप्पासो. सुरेश गोरख पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.लोकनियुक्त सरपंच कार्यकाळात श्री. पाटील यांचा गावच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले जात असून, त्याचे सकारात्मक परिणाम गावात व संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांनी ही तालुक्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. या माध्यमातून तालुक्यातील सरपंच बांधवांचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार असून त्यांना मार्गदर्शन व सहकार्य देखील मिळणार असून, तसेच गावपातळीवर अधिक सक्षम नेतृत्व तयार होण्यास हातभार लागणार आहे.तसेच या निवडीबद्दल राज्याचे मा गुलाबरावजी पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा व मा प्रतापराव पाटील जिल्हा परिषद सदस्य यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.