जळगाव दि.18 ( मीडिया कक्ष ) – आज दि.18 एप्रिल रोजी जळगाव, रावेर लोकसभा लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या अधिसुचना प्रसिद्ध झाली असून 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज निशुल्क आहे मात्र उमेदवाराला अर्ज भरताना अनामत रक्कम भरायची असून खुल्या वर्गासाठी ही रक्कम 25 हजार रुपये असून राखीव प्रवर्गासाठी 12 हजार 500 रुपये एवढी असल्याची माहितीही निवडणूक अधिकारी यांनी दिली.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही, फक्त निश्चित केलेली अनामत रक्कम भरावी लागणार...






