जळगाव:- ४३ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आयोजित शहादा नंदुरबार येथे दिनांक ११ व १२ जानेवारी रोजी दोन दिवसीय अधिवेशन संपन्न झाले. जळगाव तालुक्यातील फुपणी रहीवाशी सुप्रसिद्ध सुलेखनकार चित्रकार श्री मनोहर बाविस्कर यांचे पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रम प्रसंगी गोवलजी पाडवी खासदार, नंदुरबार आ. किशोर दराडे, शिक्षक आमदार श नरेंद्र बाराई, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मनोहर बाविस्कर यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. पुस्तकांमध्ये पूर्वीप्रमाणे सहा विषयाच्या समावेश केलेला आहे सध्या स्थितीत जरी चार विषय असली तरी यामध्ये मुक्तहस्त चित्र व निसर्ग चित्र या दोन विषयांच्या समावेश करून मुलांच्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे विशेष म्हणजे हे पुस्तक मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तयार केलेला आहे. सुप्रसिद्ध निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांचे निसर्ग चित्रांचे जल रंग माध्यमातून प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ वतीने त्यांच्या विशेष सत्कार केला होता श्री मनोहर बाविस्कर व भागवत सपकाळे यांचे कौतुक होत आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव खान्देशी चित्रकार भागवत सपकाळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !






