खामखेडा गावाचे आजी माजी सरपंच ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने सन्मानित !

0

जळगाव :- ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खामखेडा (ता. धरणगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंच धिरज गणेश पाटील व त्यांच्या पत्नी सौ वैशाली धिरज पाटील माजी लोकनियुक्त सरपंच यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.लोणावळा (पुणे) येथे पार पडलेल्या सोहळ्यात अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामपंचायत खामखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, पारदर्शक कारभार, महिला सक्षमीकरण,स्वच्छता अभियान आणि ग्रामनिधीमधील नवकल्पनांबाबत दाखवलेल्या नेतृत्व गुणांची दखल घेत धिरज पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली.या पुरस्काराबद्दल ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, हा सन्मान खामखेडा गावासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण खामखेडा ग्रामपंचायतीच्या आहे, अशा भावना धिरज पाटील यांनी व्यक्त केल्या. या सन्मानामुळे खामखेडा ग्रामपंचायतीचे नाव राज्यस्तरावर झळकले आहे.