ग्रामसत्ता संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तेजस पाटील यांचा शेतकी संघातर्फे सत्कार !

0

यावल:- तालुक्यातील शिरसाड गावाचे युवा ग्रामपंचायत सदस्य तथा यावल शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस धनंजय पाटील यांची ग्रामपंचायत सदस्यांच्या तथा राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव सर्व पक्षीय ग्रामसत्ता संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल शेतकी खरेदी विक्री संघातर्फे तेजस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, संघाचे संचालक प्रशांत चौधरी, सुनील फिरके, उमेश फेगडे, नितीन नेमाडे, नीलिमा किरंगे, लहू पाटील, डॉ.हेमंत येवले यासोबत फैजपूर नगरपालिका मा.नगरसेवक केतन किरंगे तथा संघाचे मॅनेजर शशिकांत गाजरे , कर्मचारी संजय भोईटे, मयूर बोरोले, यावलकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.