चुंचाळे येथे २६ फेब्रुवारी पासून तुलसी रामायण कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- तालुक्यातील चुंचाळे येथील श्री.अर्ध नटेश्वर महादेव मित्र मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील महाशिवरात्री व महाकुंभ पर्वणी निमित्ताने दिनांक २६ फेब्रुवारी पासून संगीतमय तुलसी रामायण कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. कथाकार ह.भ.प. श्री. नामदेव महाराज (गुरुजी) दहिगावकर यांच्या सुमधुर संगीतमय वाणीतून पंचक्रोशीतील भाविकांना या कथा सोहळ्याचा लाभ होणार आहे.भव्य दिव्य तुलसी रामायण कथा सोहळ्यात ८ दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले असून यात नियोजनाप्रमाणे सकाळी ५:०० वा. काकडा आरती तर रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत संगीतमय कथा असे नियोजन आहे. यावेळी प्रत्येक दिवशी कथेप्रमाणे वेशभूषा व पेहराव करून श्री तुलसी रामायण कथेतील जीवन जीवन चरित्र प्रसंग व देखावा सादर केले जातात. ५ मार्चंला ला भव्य दिव्य तुलसी रामायण कथेची सांगता असून त्या दिवशी गावात दिंडी मिरवणूक करून त्याच दिवशी संध्याकाळी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.तुलसी रामायण कथा सोहळ्याचे दाते म्हणून अनेक आहेत तसेच शेवटच्या दिवशी होणाऱ्या महाप्रसाद सेवेसाठी दाते म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे सहकार्य लाभले आहे. संगीतमय तुलसी रामायण कथा सोहळ्यात गायनाचारी ह.भ.प.सुनील महाराज बेटावद, ह.भ.प.मुकेश महाराज नायगाव,ह.भ.प.लीलाधर महाराज किनगाव,तबलावादक ह.भ.प. चेतन महाराज कासली.जामनेर , ह.भ.प.शिवदास महाराज आडगाव यांची साथ संगीतमय सोहळ्यात असणार आहे. मोठ्या संख्येने चुंचाळे, बोराळे, किनगाव, नायगाव, दहिगाव, मालोद, सह परिसरातील भाविकांनी संकीर्तन सह ,तुलसी रामायण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.अर्धनटेश्वर महादेव मंदिर मित्र मंडळ चुंचाळे तर्फे करण्यात आले आहे.