जळगाव बस स्थानकातील स्थानिक प्रमुख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी व भोंगळ कारभाराबाबत प्रधानमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल !

0

जळगाव:- नवीन बस स्थानकातील स्थानिक प्रमुख कार्यालय येथे बस चालकाबाबत तोंडी तक्रार करण्यास गेले असता सदर स्थानिक प्रमुख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. “हम करे सो” कायदा आमच्याकडे कुठलीही तक्रार दाखल होत नाही. अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली सदर वाहक व चालक बाबत जर तक्रार करायची असेल तर प्रवाशांनी तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. अधिकाऱ्यांना अधिक विचारणा केली असता उमटगिरी ची व अरेरावीची भाषा एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी वापरतात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर न करणाऱ्या व पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय स्तरावरून चौकशी करून योग्य ती कारवाई होण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालय, मानवधिकार आयोग व मंत्रालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.