जळगाव, दि.१(जिमाका वृत्तसेवा) – जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज अल्पबचत भवन, येथे अपर जिल्हाधिकारी विजय कुमार ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 73 अर्ज प्राप्त झाले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, तहसीलदार डॉ.उमा ढेकळे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना या वेळी निर्देश देण्यात आले. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन अर्जांवर कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.






