जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दिनांक ७ ऑगस्टला रोजगार मेळाव्याचे आयोजन !

0

जळगाव, दि.5:– जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे होणार आहे. या रोजगार मेळाव्यात हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, मेडी असीस्ट आणि एस.पी. फार्मास्युटिकल्स या तीन नामांकित उद्योगसमूहांनी सहभागी होत एकूण ४२ रिक्त पदांकरिता भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. ज्यात

हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव

– सेल्स एक्झिक्युटिव्ह व ग्राफिक्स डिझायनर: कोणत्याही शाखेचा पदवीधर

– अकाउंटंट: बी.कॉम पदवीधर

मेडी असीस्ट, जळगाव

– आरोग्य मित्र: कोणत्याही शाखेचा पदवीधर

एस.पी. फार्मास्युटिकल्स, जळगाव

– अकाउंटंट: बी.कॉम पदवीधर

– ऑफिस बॉय, हेल्पर (ग्रॅन्युलेशन आणि पॅकिंग): १२वी उत्तीर्ण

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या User ID व Password चा वापर करून लॉगिन करावे आणि उपलब्ध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह थेट मुलाखतीच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे.या मेळाव्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा 0257-2959790 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.