जळगाव:- यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक यांच्या भोंगळ व मनमानी कारभारा बाबत राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरोचे जिल्हा अध्यक्ष, श्री. मुकेश एम कोळी यांनी तक्रार पत्र क्र.NHRCCB/JA/MH/14/2024 दि.20/02/2024 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे तक्रार करून यावल पुरवठा निरीक्षक यांची विभागीय स्तरावरून चौकशी करण्यात यावी अशी तक्रारीद्वारे मागणी केली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्राप्त तक्रार अर्जावर शासकीय नियमानुसार कारवाई न करता शासकीय नियम धाब्यावर ठेवून तब्बल 12 महिन्यानंतर तक्रारीची दखल घेत पत्र File No.COLJG-30018(13)/47/2024-SUPPLY दि.7 मार्च 2025 रोजी यावल तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले. यावल येथील तत्कालीन पुरवठा निरीक्षक यांची दप्तर तपासणी करावी व अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा तरतूदी विचारात घेऊन प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले होते. आदेश प्राप्त होऊन दहा दिवस होऊन देखील यावल तहसीलदार यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त न झाल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दि.21 मार्च 2025 रोजी यावल तहसीलदार यांना पुन्हा पत्रव्यवहार करून तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावे असे आदेश दिले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोन पत्र व्यवहार करून देखील यावल तहसीलदार यांनी कुठल्याच प्रकारची चौकशी केल्याचे दिसून आले नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोन वेळेस आदेशित करून देखील यावल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरोचे जिल्हा अध्यक्ष श्री. मुकेश एम कोळी यांना यावल तहसीलदार यांनी दि.17 मार्च 2025 रोजी फोनद्वारे संभाषण करून पुरवठा निरीक्षण यांची दप्तर तपासणी साठी चौकशी समिती स्थापन करून तत्काळ चौकशी करून तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवण्यात येईल व अहवालाची एक प्रत अर्जदाराला पत्रव्यवहार करून पाठवण्यात येईल असे यावल तहसीलदारांनी आश्वासन दिले होते. वीस दिवस होऊन देखील यावल तहसीलदार यांच्याकडून चौकशी केल्याबाबतचा कुठलाही अहवाल प्राप्त झालेला नाही.
राजकीय दबाव कि खेळ पैशाचा ?
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज पत्र क्र.NHRCCB/JA/MH/14/2024 दि.20/02/2024 रोजी सादर करण्यात आला होता.जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शासकीय नियम धाब्यावर ठेवून प्राप्त तक्रार अर्जावर तब्बल 12 महिन्यानंतर चौकशी करन्याचे आदेश दिले.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्र क्र. File No.COLJG-30018(13)47/2024-SUPPL दि.7 मार्च 2025 व दि.21 मार्च 2025 रोजी यावल तहसीलदार यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला यावल तहसीलदारांनी केराची टोपली दाखवली राजकीय दबाव कि खेळ पैशाचा? भोंगळ व मनमानी कारभार करणाऱ्या यावल पुरवठा निरीक्षकाची चौकशी करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तसेच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी यावल तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकार यांनी शासकीय नियमानुसार प्राप्त तक्रार अर्जावर कारवाई न केल्याप्रकरणी यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोग दिल्ली , लोकसेवा आयोग तसेच मे.न्यायालयात खटला दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरोचे जिल्हा अध्यक्ष श्री.मुकेश एम कोळी यांना दिली. संबंधित विभाग काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष वेधू लागले आहे.






