जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्त):- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव तसेच माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने सभागृह व्यवस्थापक-२, वसतिगृह अधिक्षक-०१, वसतिगृह अधिक्षीका-०१, पहारेकरी कम एमटीएस -०४, सफाई कर्मचारी -०२ व स्यंवपाकी-४ ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झालेस नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह दिनांक ०५ जून २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी ०२५७- २२४१४१४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात येणार, अर्ज करण्याचे आवाहन !






