नवरात्रीनिमित्त आदिवासी महिलांचा साडीचोळी भेट देऊन केला सन्मान !

0

यावल:- नवरात्री उत्सव म्हणजे नऊ रंगाच्या नऊ साड्या परिधान करण्याचा उत्सव होय त्यामुळे हा उत्सव आदिवासी गोरगरीब महिलांनी देखील साजरा करावा यासाठी दहिगाव गावातील शिवशंभू संघटनेकडून आदिवासी महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली. साकरे येथील युवती प्रदेश अध्यक्ष कविताताई पाटील व युवती तालुका अध्यक्ष दिव्याताई पाटील यांनी आदिवासी पाड्यांना जाऊन साडी चोळी भेट देऊन गरजू महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले वंचित महिलांना या उत्सव निमित्त आपण साडी चोळी भेट दिली पाहिजे असा उद्देश समोर ठेवत यांनी हा उपक्रम राबवला. नवरात्री निमित्त आदिवासी पाडा गायरान येथील महिलांना साडी चोळी देऊन सन्मान केला या वेळी मयूर पाटील व कल्पेश पाटील उपस्थित होते.