नंदुरबार, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारक, कुटूंब निवृत्तीवेतन धारक यांचे मागील वर्षाप्रमाणे चालू वर्षीही माहे नोव्हेंबर 2023 या महिन्यात जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने कोषागात स्विकारले जाणार असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव महाले यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ज्या बँकेत निवृत्ती वेतन घेत आहेत त्या बँकेत हयातीच्या दाखल्यांवर आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी, जेणेकरुन माहे डिसेंबर 2023 पासूनचे निवृत्ती वेतन बंद होणार नाही, याची सर्व निवृत्तीवेतन धारक, कुटूंब निवृत्तीवेतन धारक यांनी नोंद घ्यावी. असेही श्री. महाले यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.






