महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त चुंचाळे येथे साबुदाणा खिचडीचे वाटप !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- तालुक्यातील चुंचाळे येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना सुपडू पाटील यांच्याकडून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील सोपन पाटील, दिवाकर पाटील, गणेश पाटील, युवराज पाटील यांनी देखील सहकार्य केले. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा अनेक गावांमध्ये प्रसाद म्हणून, केळी, सफरचंद, कंद, त्यात बरोबर साबुदाणा,भगर या सारख्या उपवासासाठी लागणाऱ्या वस्तूंची खिचडी बनवून भाविकांना वाटली जाते.