प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व आश्रय फाउंडेशन यावल यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी व बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक श्री. सुनील भोईटे, श्री. दिनेश बारेला (प्रतिनिधी कौशल्य विकास मंत्रालय मुंबई) उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. कुंदन फेगडे (अध्यक्ष आश्रय फाऊंडेशन जळगाव) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जळगाव जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत विद्यार्थी, विद्यार्थीनीं व होतकरू तरूणांनी शिक्षण घेऊन बेरोजगार राहण्यापेक्षा रोजगार निर्मितीसाठी कंपन्या, योजनांच्या माध्यमातून संधी शोधल्या पाहिजेत विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाळ रोजगार हमी योजना शहरांमध्ये उपलब्ध आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदार अठरापगड जातींसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी महास्वंय रोजगार संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली आहे. असे सांगितले. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते सौ.मंजुश्री गायकवाड (गटविकास अधिकारी यावल) यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असतानाच रोजगाऱ्याच्या संधी शोधल्या पाहिजेत स्वता विकसित होत देशाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन शहरात रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिक्षणाबरोबरच गुणवत्ता, व्यक्तिमत्व विकास असणे महत्त्वाचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य युक्त शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. हे विद्यार्थ्यांनी शालेय वयातच स्वताला ओळखले पाहिजे असे सांगितले.रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कुं. चेतना कोळी या विद्यार्थीनीने स्वागतगीत गायन केले. व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन झाले. रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने महाविद्यालयात जळगाव जिल्ह्यातील ११ नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इ. लिमिटेड उमाळे – बाबा राजपूत, हिताची अष्टमी इंडिया – श्री. नन्नवरे, जैन फार्म फ्रेश फड्स – श्री.भीकेश जोशी, सुप्रीम इंडस्ट्रीज, क्रेडिट एक्सेस ग्रामीण – श्री राजू पाटील, स्टार फेब्रीकेटर्स कॅटर्स एम आय. डी. सी. जळगाव-, सिग्मा फॅसिलिटी जळगाव श्री. सचिन पवार, एल.आय.सी.ऑफ इंडिया जळगाव – श्री. जितेंद्र सैदाने, राईट सिस्टीम अँन्ड सॉफ्टवेअर जळगाव- मंदार व्ही शांडिल्य, आय. टी.एम. जळगाव – अविनाश भडाने , समर स्टील इंडस्ट्रीज,नो भारत अमरावती, एस. पी. के. सुतगिरणी यावल ह्या कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ३३७ विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मुलाखतीला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील, डॉ. सुधीर कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ.आर. डी. पवार डॉ. पी.व्ही. पावरा, श्री.पराग पाटील (सचिव आश्रय फाउंडेशन यावल), श्री. अरुण ठाकरे, श्री.शेखर पटेल,श्री. सुभाष कदम, श्री. महेश चौधरी, श्री. दीपक बोरसे, श्री. सागर लोहार, प्रा.मयुर सोनवणे, प्रा. मनोज पाटील, प्रा. चिंतामण पाटील, प्रा. राजू तडवी प्रा. अरुण सोनवणे, प्रा. एकनाथ सावकार, प्रा. संजीव कदम, प्रा. राजेंद्र थिगळे, कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नंदकिशोर बोदडे, प्रा. सुभाष कामडी, डॉ. संतोष जाधव, प्रा. सि.टी. वसावे, प्रा. नरेंद्र पाटील प्रा. रजनी इंगळे डॉ. वैशाली कोष्टी डॉ. निर्मला पवार, प्रा. प्रशांत मोरे, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा.अर्जुन गाढे, श्री. मिलिंद बोरघडे, श्री. संतोष ठाकूर, श्री. प्रमोद भोईटे, श्री. अनिल पाटील, श्री. प्रमोद जोहरे, श्री.प्रमोद कदम, श्री. अमृत पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विजय रिसे (सहाय्यक आयुक्त जळगाव) यांनी केले सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार श्री. श्रीकांत लांबोळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला ३३७ विद्यार्थी मुलाखतीला उपस्थित होते.






