उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे मानद सचिव दादासाहेब विरेंद्र भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक बापूसाहेब वसंतराव भोसले, श्री. सुनीलभाऊ भोईटे, श्री.रवी पाटील,श्री. नितीन पाटील,श्री.भगतसिंग पाटील, हे उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,यांनी प्रा. पाटील यांच्याबद्दल माहिती सांगितली .
महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रा. अर्जुन पाटील यांनी महाविद्यालयात गेली ३५ वर्षे सेवा देताना न्याय, समता, सचोटी निस्वार्थी भावना महाविद्यालयाच्या कामातील पारदर्शकपणा व प्रामाणिकपणा आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले . कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी कार्यक्रमाला उत्तर देताना सांगितले की 1989 मध्यें महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर आज पर्यंत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली व महाविद्यालयाच्या कामकाजातील प्रामाणिकपणा, निस्वार्थी भावना ठेवून काम केले. त्यासाठी ८ प्राचार्यांचे सहकार्य लाभले .आता पर्यंत महाविद्यालयाचे तीन वेळा नॅक मुल्यांकन झाले त्यात महात्वाचे काम केले असे सांगून प्रा.पाटील यांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमाला श्री. कृष्णा पाटील, सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुधा खराटे, प्रा.पाटील यांच्या अर्धांगिनी सौ.हेमलता पाटील, सेवानिवृत्त क्रिडा संचालक श्री. महेंद्र सोनवणे, डॉ.हेमंत भंगाळे, प्रा.एस.आर. गायकवाड, डॉ. हेमंत येवले, प्रा. मुकेश येवले, सेवानिवृत्त प्रा.पी.एस.पाटील, प्रा. ए.जी.काटकर,श्री.किरण देशमुख श्री अनिल इंगळे
उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले तर आभार नवनियुक्त उपप्राचार्य प्रा. डॉ. एस पी कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आर. डी. पवार, डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा.संजीव कदम प्रा. चिंतामण पाटील, प्रा.मयुर सोनवणे, श्री. मिलिंद बोरघडे, श्री. संतोष ठाकूर, श्री. प्रमोद कदम,श्री.अनिल पाटील, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






