यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘महिला तक्रार निवारण समितीचे’ उद्घाटन करण्यात आले. प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार यांनी केले.प्रा.एम.डी. खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींना कोणी त्यांच्या रंग,रूप,वेशभूषा यावरून किंवा अश्लील शब्द बोलत असेल तर त्यासंबंधी त्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील या समितीकडे आपली तक्रार नोंदवावी. तसेच मुलींनी जागरूक राहणे अतिशय महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य प्रा.ए. पी.पाटील यांनी देखील विद्यार्थिनींना अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार प्रा.डॉ.निर्मला पवार यांनी मानले.तसेच प्रा.डॉ.वैशाली कोष्टी व प्रा.रजनी इंगळे यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.






