यावल महाविद्यालयात महिला तक्रार बैठक संपन्न !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम डी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला तक्रार निवारण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांची काळजी, सुरक्षा तसेच दडपण आणि नैराश्य भावना ह्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्याचे योग्यरीत्या निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती कार्यरत आहे असे सांगितले कार्यक्रमाला डॉ.वैशाली कोष्टी, प्रा. आश्विनी कोल्हे, प्रा. रूपाली शिरसाठ प्रा. इमरान खान तसेच विद्यार्थीनीं उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, दुर्गादास चौधरी, प्रमोद जोहरे यांनी परिश्रम घेतले.