यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम अंतर्गत “अमृत कलश ” संकलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या शुभहस्ते ‘अमृत कलश’ मध्ये एक मुठ माती टाकून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे होत्या. उद्घाटन प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीकर यांनी हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या भावना जागृत झाल्या आहेत. स्वातंत्र्य सेनानी यांचा त्याग व बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या प्रति मनात संवेदना जागवणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे अशी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी ‘मेरे माटी मेरा देश’ उपक्रम अंतर्गत अमृत कलश संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. हा उपक्रम स्तुत्य असून या माती पासून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालयात वेगळा ठसा निर्माण होईल असे सांगितले. भारताचे अमृत महोत्सवाचा अमृतकाळ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवहनानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना मधील स्वयंसेवकांनी आपापल्या गावातून एक मूठ माती आणून 21 कलश तयार करण्यात आले. या कलशातील थोडी माती घेऊन महाविद्यालयाचा “अमृत कलश” मध्ये माती सर्व मान्यवरांच्या हस्ते टाकण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने 75 कुंड्या तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक कुंडीवर यावल तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी व त्यागींची तसेच भारतातील स्वातंत्र्य सेनानी यांची ओळख म्हणून नावे देण्यात आलेले आहे. या कुंड्यांमध्ये विविध फुलझाडे तसेच तुळशीची रोपे लावून “अमृतवाटिका” तयार करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए.पी. पाटील, प्रा. संजय पाटील प्रा. मुकेश येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार यांनी केले तर आभार प्रा. सौ. प्रतिभा रावते यांनी मानले. कार्यक्रमात डॉ. हेमंत भंगाळे डॉ. सुधीर कापडे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. चिंतामण पाटील, प्रा. संजीव कदम, प्रा. अरुण सोनवणे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, डॉ. संतोष जाधव, प्रा. छात्रसिंग वसावे, प्रा. नरेंद्र पाटील, डॉ. निर्मला पवार डॉ. वैशाली कोष्टी प्रा. मिलिंद मोरे प्रा. प्रशांत मोरे प्रा. पी व्ही सपकाळे, प्रा. प्रशांत गाढे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, नवमेश तायडे, शाहरुख तडवी, तेजश्री कोलते संध्या कोळी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






