यावल येथे श्री महाशिवपुराण कथेचा समारोप !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- न्यू व्यास नगर फैजपूर रोडवरील नर्मदेश्वर महादेव येथे श्री महाशिवपुराण कथेचा समारोप करण्यात आला. या भव्य दिव्य श्री महाशिवपुराणाचे कथन (वृंदावन धाम) जळगावचे कृष्णकृपा प्रेम मूर्ती दिलीप महाराज यांनी या कथेचे कथन केले. तसेच संगीत विशारद मुकेश महाराज सांगवीकर, तबलावादक रामेश्वर महाराज ,वेशभूषाकार दर्शक श्री किशोरजी महाराज, साउंड ऑपरेटर भैयाजी , सहकार्य करणारे प्रकाश चौधरी चुंचाळेकर, मंडपवाले पवनजी आदी सर्वांचा समारोप निमित्त सत्कार करण्यात आला. प्रेम मूर्ती दिलीप जी महाराज यांचा सत्कार येवले मावशी,किशोर पद्माकर भावसार व संतोष ठाकूर , नामदेव बारी, दामू पाटील चुंचाळेकर यांनी केला. मंचावरील सर्व मान्यवर महाराजांचे सत्कार येवले मावशी, रेखाताई पाटील, गायत्री ताई, प्रतिभाताई, सुभाष कोळी, योगेश बारी,योगेश चव्हाण,योगेश पाटील,निलेश रावते, आनंदा चौधरी,सागर बारी, रवींद्र इंगळे ,अशोक काका, मिलिंद चव्हाण , राजपूत हितेश महाराज, दिलीप पाटील,संदीप माळी, शरद बारी,देवेंद्र पाटील, संदीप पाटील बबलू येवले सर्व व्यास नगरीतील भक्त जणांनी सत्कार केला.या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री संतोष वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाचा समारोप ग्रंथ दिंडी काढून व नर्मदेश्वर महादेव मंदिर व्यास नगर या ठिकाणी समाप्ती करण्यात आली. व्यास नगर, एस.टी कॉलनी, समर्थ नगर, भास्कर नगर, कृष्णाजी नगर, व आजूबाजूच्या कॉलनी सर्व महिला मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात आयोजन केले.देणगी देणार व भंडारा करण्या करिता दान करणारे सर्वांचे आयोजकांकडून आभामानण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू व्यास नगर मधील माता भगिनींनी सर्वात जास्त परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली व त्यांचे सुद्धा आयोजकांनी आभार मानले.