प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मुंबई येथे झालेल्या बैठकीत राकेश सोनार यांची रावेर लोकसभेच्या जिल्हाअध्यक्ष म्हणून विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अमोल मीटकरी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. राकेश सोनार यांनी राष्ट्रवादी विद्यार्थ्यी कॉंग्रेसच्या यावल तालुकाअध्यक्ष पदी काम केलेले आहे कोरोना काळात राकेश सोनार यांनी तालुकाअध्यक्ष म्हणून काम करीत असतांना विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न शासना पुढे मांडून सोडवीलेले आहेत. राकेश सोनार यांनी केलेल्या कामांना लक्षात घेऊनच राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या मांन्यतेने ही निवड करण्यात येत असल्याचे विधान परिषदेचे आमदार अमोल मीटकरी यांनी सांगीतले.
निवडी नंतर राकेश सोनार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार व उपस्थित संर्वाचे आभार मानले. व येणार्या काळात अधीक ताकदीने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून रावेर लोकसभेत संघटना वाढवणार असल्याचे राकेश सोनार यांनी सांगीतले. या निवडी बद्दल राकेश सोनार यांना सावदा शहराचे माझी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पाटील, रावेर लोकसभा जिल्हाअध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी विद्यार्थ्यी कॉंग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, गौरव वानखेडे, अँड.देवकांत पाटील , विनोद पाटील , किशोर माळी, नाना पाटील, हेमंत कोळी, नयन करांडे, योगेश पवार आदींनी शुभेच्छां दिल्या.






