जळगाव:- शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे अशी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शहरातील विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.त्यांनी वाहतुकीचे मार्ग त्वरित खुले करण्यासाठी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीवर त्वरीत उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी व आवश्यक असल्यास 1077 या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.जिल्हा प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा.






