शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु –  सुंदरसिंग वसावे

0

नंदुरबार, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) – भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावयासिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडबीटी पोर्टलवर सुरु झाले असल्याची माहिती, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहनही सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.