संगणकीय प्रणाली सुरळीत सुरु होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे – किरण बिडकर

0

नंदुरबार, दि. 6 (जिमाका वृत्त) – सारथी या संगणकीय प्रणालीवर वाहन परवाना काढण्यासाठी सद्यस्थितीत संगणकीय अडथळे येत असून सदर अडचणींचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. ही प्रणाली सुरळीत सुरु होईपर्यंत जिल्ह्यातील वाहनचालक, संबंधित संघटनेचे प्रतिनिधी, व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.