उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- साकळी येथील लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील यांचे वडील कै.नागो श्यामजी पाटील यांच्या २१व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिपक पाटील व जिवन पाटील या दोघं भावांनी आपल्या कुटुंबीयांकडून सामाजिक सेवेच्या दातृत्वाच्या भावनेतून दि.२० रोजी पुण्यस्मरण कार्यक्रमात गाव- परिसरासाठी तब्बल ४० खुर्च्या समर्पित केल्या.गाव परिसरात कोणत्याही जाती- धर्मात कोणाकडेही कुटुंबात मृत्युची घटना घडली असता त्या ठिकाणी नातेवाईकांना-आप्तस्वकीयांना बसण्यासाठी खुर्च्यांची गरज लागत होती. ही गरज पूर्ण करण्यासाठी बसण्यासाठी २१ हजार रू किमतींच्या ४० खुर्च्या देऊन दिपक पाटील व जिवन पाटील कुटुंबीयाने या प्रेरणादायी दातृत्व दाखवून गावासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटूभाऊ) पाटील,ज्येष्ठ नागरिक मधुकर शिंपी, साकळी नूतन विकासोचे चेअरमन अरुण खेवलकर,ज्येष्ठ संचालक सुभाषनाना महाजन,सुनिल नेवे,उपसरपंच फक्रुद्दीनखान कुरेशी, साहेबराव बडगुजर यांचेसह आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य,विविध पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.सदर खुर्च्या नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या असून गाव-परिसरात कोणाकडेही मृत्युची दुःखद घटना घडली असेल फक्त त्यांच्याकडे किमान १० दिवसांसाठी या खुर्च्या विनामोबदला वापरण्यासाठी देण्यात येणार आहे.खुर्च्या ने- आण करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कुटुंबाची असणार आहे. असे कार्यक्रमादरम्यान सर्वानुमते ठरविण्यात आलेली आहे. कार्यक्रमात सुभाष महाजन , योगेश (आप्पा) खेवलकर, सौरभ जैन (सर) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.






