उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल: – तालुक्यातील साकळी येथे शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत कार्यालयात ३५० वा छत्रपती शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच दिपक पाटील यांच्या हस्ते शिवमुद्रा चित्रित भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य परमानंद बडगुजर,खतीब तडवी,मुकेश बोरसे,विनोद खेवलकर,नरेंद्र मराठे यांचे सह ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली,पंढरीनाथ माळी यांचे सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.






