यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळावी यासाठी “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम घेण्यात आला होता. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. आर. डी. पवार यांनी “माझी माती माझा देश” या राष्ट्रीय उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी गावागावातून माती आनून कुंड्यांमध्ये जमा केली होती. कुंड्यावर स्वातंत्र्य सैनिकांचे नाव लिहले होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरणार, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील याशिवाय डॉ. सुधीर कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. मुकेश येवले, प्रा. अरूण सोनवणे, प्रा. संजीव कदम, प्रा. एकनाथ सावकार, प्रा. राजू तडवी, प्रा. चिंतामण पाटील, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, प्रा.नंदकिशोर बोदडे, डॉ. संतोष जाधव, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. सी टी. वसावे, प्रा. अर्जुन गाढे, प्रा. प्रशांत मोरे, डॉ. निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी, श्री. संतोष ठाकूर, प्रमोद जोहरे यांनी सहकार्य केले.