इयत्ता नववी व अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे – पी. आर. कोसे

0

नंदुरबार, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी, नंदुरबार- 02 या विद्यालयात सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी व अकरावी प्रवेशाच्या निवड परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे माहिती विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

यासाठी पात्रता

नंदुरबार जिल्ह्यातील फक्त नवापुर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेमध्ये विद्यार्थी इयत्ता आठवी आणि दहावीत शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये शिकत असावा. विद्यार्थ्याचा जन्म 01 जून 2007 व 31 जुलै 2009 नंतर झालेला नसावा, अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव असून तुतीयपंथीय उमेदवार सुद्धा नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी अर्ज करू शकतील. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेतून सोपी केली असून प्रवेश चाचणी परीक्षा-2024 साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाइल व टॅब यासाठी नवोदय विद्यालय समितीच्या https://navodya.gov.in/nvs/en/Home1 किंवा https: //cbseitems.nic.in/ या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाचणी परिक्षा शनिवार 10 फेब्रुवारी 2024 रोजी होणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 ही आहे. परिक्षेचे ऑनलाइन अर्ज भरणे मोफत असून उमेदवारांनी त्वरित अर्ज भरावे असे आवाहनही प्राचार्य श्री. कोसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.