नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न; चाळीसगाव निवासी शाळेचा संघ विजयी !

0

नाशिक, दि.२८ :- मा. आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांच्या नाशिक विभागातील विभाग स्तरीय फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या दिनांक 28 ऑक्टोंबर 2023 रोजी संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे अध्यक्ष मा. श्री. माधव वाघ, प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभाग नाशिक, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री राधाकिसन देवढे सहायक आयुक्त कल्याण अहमदनगर यांनी नाशिक विभागातील 7 शासकीय निवासी शाळां शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले. सदर स्पर्धेत एकूण 6 सामने घेण्यात आले. सदर सामन्यांमध्ये मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव जि. जळगाव हा संघ विजेता व मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर जामखेड जिल्हा अहमदनगर. हा संघ उपविजेता ठरला. मा. श्री. माधव वाघ प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिक व मा.श्री. राधाकिशन देवढे यांनी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले व विजेता, उपविजेता संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील विद्यार्थी गौरव बापूराव वाघ हा सर्व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला. श्री राधाकिसन देवढे सहायक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागातील सर्व निवासी शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.