यावल महाविद्यालयात इलेक्ट्रिक प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन !

0

यावल:- येथील जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गाचे संयोजक प्रा.सी.के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग चालविला जात असून या वर्गाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए.पी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना या वर्गात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच उद्योग अथवा आपल्याला स्व अडचणी आल्यास सोडवण्यास मदत होते.या दृष्टीने विविध विद्युत उपकरणे व त्यासाठीची साहित्या बाबत माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. सी.के.पाटील यांनी केले तर आभार प्रा.सी.टी.वसावे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,डॉ.आर.डी.पवार, डॉ.एस.पी.कापडे,आदी उपस्थित होते.