यावल:- दिवाळीची खरी सुरुवात म्हणजे वसुबारसने होते त्या दिवशी आपआपल्या गौमातेच पुजण करून तिला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून वसुबारस साजरा करावा गौमातेतच महालक्ष्मी चा वास आहे तसेच गोठ्यात गाय व घरात माय असल्याशिवाय घराला घरपण येत नाही तरी प्रत्येकाने गौमातेच संरक्षण व संगोपन करावे असे ह.भ.प.सचीत महाराज यांनी आपल्या मनोगतात सांगितले. दिनांक ९/११/२३ रोजी यावल तालुक्यातील निमगाव येथे निसर्गरम्य परिसरात असलेली गौशाळा म्हणजे गोवर्धन गौशाळेत आज यावल शहरातील मान्यवरांच्या हस्ते गौमातेच पुजण करण्यात आले व सर्व गायी ना पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालून विधीवत पूजन करून वसुबारस साजरी करण्यात आली संपुर्ण गौशाळेत रांगोळ्या काढून फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी डॉ गौरव धांडे, डॉ.कुंदन फेगडे,अँडव्होकेट राजेश गढे, लीलाधर गढे, प्रमोद धांडे, सुलभा धांडे , गोवर्धन गौशाळेचे अध्यक्ष गोपाल कोळी, अध्यक्ष अरुण तावडे, सचीव चेतना कोळी, विजया तावडे, बाळू तावडे, लिलाबाई तावडे, ह.भ.प संचित महाराज कोळी ,सागर कोळी, प्रकाश चौधरी ,यश वारके, विनायक बारी, क्रिष्णा कोलते, पंकज राजपुत, सुरज पाटील, पिंटु कोळी, राजु कोळी, प्रकाश कोळी, हुकुम कोळी, यासह गावातील तरुण मंडळी, गौरक्षक, उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव निमगाव गोवर्धन गौशाळेत वसुबारस साजरी; गौमातेतच महालक्ष्मी चा वास ह.भ.प.सचीत महाराज