साकळी येथे मोफत हरभरा बियाणे वाटप व बीज प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !

0

यावल:- साकळी येथे कृषी विभाग,यावल तसेच नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकर्‍यांना हरभरा बियाण्याचे मोफत वाटप व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम दि.९ रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम हा राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२३-२४ रब्बी हंगाम अंतर्गत कडधान्य सलग पीक प्रात्यक्षिक या माध्यमातून घेण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी यावल तालुका कृषी अधिकारी श्री भरत वारे साहेब यांचेसह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी वारे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना सीडड्रमद्वारे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कशी केली जाते,बीज प्रक्रियेचे महत्त्व किती आहे तसेच बियाणे उगवण क्षमता चाचणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार (किनगाव) कृषी पर्यवेक्षक ए.के नारखेडे,कृषी पर्यवेक्षक किरण वायसे,कृषी सहाय्यक एच.पी.चौधरी(साकळी), कृषी सहाय्यक एम.एस मिटके(किनगाव) तसेच साकळीसह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ विलास नेवे यांनी केले.पिकासाठी लागणाऱ्या निविष्ठ फवारणीचे औषधे व इतर उपयुक्त वस्तू आणि माहिती वेळोवेळी यावल कृषी विभागामार्फत मिळणार आहे.असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तसेच बीज प्रक्रिया मिलेट्स विविध योजना याबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच हरभरा बियाण्यासोबत ज्वारीचे बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करावी यासंदर्भात सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षित करण्यात आले. या कार्यक्रमात २५ लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपचा लाभ देण्यात आला.यावेळी कंपनीचे अध्यक्ष जगन्नाथ नेवे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास नेवे, सदस्य दिपक महाजन,चंद्रकांत नेवे,संजय पाटील यांचे सह साकळी सह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.