नंदुरबार, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी पर्यटन महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात येणार असून महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी स्थानिक इच्छूक, अनुभवी व नोंदणीकृत कार्यक्रम व्यवस्थापन संस्था किंवा व्यक्ती यांनी अंदाजपत्रक सादर करावे असे आवाहन पर्यटन संचालनालय नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उपसंचालक कार्यालय, पर्यटन संचालनालय, नाशिक यांच्यामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन वाढ होणे, पर्यटन स्थळांचा विकास होणे, स्थानिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणे व रोजगार उपलब्ध होणे या उद्देशाने आदिवासी पर्यटन महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे स्थानिक स्तरावर नियोजन करण्यासाठी स्थानिक इच्छूक, अनुभवी व नोंदणीकृत कार्यक्रम व्यवस्थापन संस्था किंवा व्यक्ती यांनी 13 नोव्हेंबर 2023 पूर्वी पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422001 दूरध्वनी क्रमांक 0253-2995464 व ईमेल पत्ता ddtourism.nashik-mh@gov.in या कार्यालयास संपर्क साधावा असेही उपसंचालक श्रीमती सरदेसाई यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
Home ताज्या घडामोडी आदिवासी पर्यटन महोत्सव आयोजनासाठी स्थानिक संस्थांनी अंदाजपत्रक सादर करावे – मधुमती सरदेसाई