भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचा रोजंदारी कञाटी मजुरांच्या हितार्थ न.प.चोपडा कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण !

0

चोपडा:- नगरपरिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचा दि. 20 नोव्हेंबर रोजी भारतीय सविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे हे नगरपरिषद प्रशासन संचालनालाय बेलापूर नवी मुंबई येथे रोजंदारी कञाटी शोषित दलित बहुजन समाजातील मजुराच्या हितार्थ आमरण अन्नत्याग उपोषणास बसणार आहेत. त्याच अनुषंगाने चोपडा नगरपरिषद चोपडा येथे सकाळी ११.३० वाजेपासून ते १.३० वाजेपर्यंत उपोषणास काळी फित लावून निषेध व्यक्त केला.भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचा विजय असो ,रोजंदारी कञाटी मजुरांना न्याय मिळालाच पाहिजे, एकच नारा रोजंदारी कञाटी शोषित दलित मजुरांना न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा दिल्या महाराष्ट्र राज्यातील 387 नगरपरिषद नगरपंचायत अ.ब.क वर्गामध्ये शोषित दलित रोजदारी कञाटी मजुरांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे जमा करावे व त्यांचा ईपीएफ कार्यालयामध्ये जमा करण्यात यावा त्यांचे शोषण करून आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकार यांचे कडून पैसे वसूल करून त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे व दोषी ठरणाऱ्या संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. उपोषण स्थळी सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दिली. यावेळी जिल्हा महासचिव हेमकांत गायकवाड, तालुका अध्यक्ष सुनील पावरा,तालुका उपाध्यक्ष डाॕ.रवींद्र कोळी,शहर सचिव विकी पारधी,शहर कार्याध्यक्ष राहुल बाविस्कर,तालुका संघटक दिनेश पाटील, तालुका सदस्य समाधान बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते संदिप बाविस्कर यांनी देखील उपोषणास पाठिंबा दिला.उपोषण सोडविण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विनायक पाटील यांनी सरबत पाजुन उपोषण सोडविले.