पशुधनाच्या वंध्यत्वाची तपासणी करून घ्यावी – डॉ. उ. दे. पाटील

0

नंदुरबार, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा): राज्यव्यापी ‘वंध्यत्व निवारण अभियान’ अंतर्गत पशुपालकांनी आपल्या भाकड पशुधनांची वंध्यत्व तपासणी करून योग्य औषधोपचार करून घ्यावे, असे आवाहन आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे. पाटील, यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. शेतकरी, पशुपालक त्यांच्याकडील गायी-म्हशींमध्ये असलेल्या, उदधवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी 19 डिसेंबर 2023 पर्यंत राज्यामध्ये ‘राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान’ राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने व पशुचिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये किमान एका वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी पशुपालकांना त्यांच्याकडे असलेले प्रत्येक भाकड दुधाळ जनावरांची अभियानात तपासणी करून आवश्यक औषधोपचार करुन घ्यावे. या अभियानाबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा व असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.