पेसा दाखल्यासाठी वेब पोर्टलवर अर्ज सादर करावेत – मंदार पत्की

0

नंदुरबार, दि. ७ (जिमाका वृत्त) तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा, व धडगाव तालुक्यातील उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) दाखला देण्यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे, उमेदवारांनी या पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहा जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिसुचनेनुसार अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) 17 संर्वर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी संबधित उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवासी दाखला आवश्यक आहे. हा दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यालयामार्फत देण्यात येतो. त्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज https://collector.absoftwaresolution.in/user/login या वेब पोर्टलच्या लिंकवर जाऊन सादर करावेत. उमेदवारांनी अर्ज भरतांना तहसिलदार यांचेकडील अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र व उमेदवार राहत असलेला पाडा हा पेसा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसुल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, महिलासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील, असेही प्रकल्प अधिकारी श्री. पत्की यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.