यावल:- जळगाव जिल्हा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या निर्देशानुसार भव्य इस्रोचे चंद्रयान 3 बाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी Grand Solute to ISRO ऑनलाईन कार्यक्रम महाविद्यालयातील IQAC विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे वक्ते विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी इस्रोचे अभिनंदन करतांना भारतीय शास्त्रज्ञांनी अभिमानाचे काम केले आहे. भारत दक्षिण ध्रुवावर चंद्रयान- 3 पोहचवणारा जगातील पहिला देश आहे, असे गौरवोद्गार कुलगुरूंनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नारसिंग वळवी सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील 95 विद्यार्थी व विद्यार्थिनीउपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, उपप्राचार्य प्रा.एम. डी. खैरनार, प्रा.संजय पाटील, डॉ.आर. डी. पवार, डॉ. सुधीर कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. एकनाथ सावकारे, प्रा. शेखर चव्हाण, प्रा. अरुण सोनवणे, प्रा. मनोज पाटील, प्रा. राजू तडवी हे उपस्थित होते. प्रा. सुभाष कामडी, डॉ.संतोष जाधव, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.सी. टी. वसावे प्रा.मिलिंद, मोरे प्रा.प्रशांत मोरे, प्रा अर्जुन गाढे यांनी का कार्यक्रमाला सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.