जनतेच्या जीवाची मनसेला काळजी; यावल निमगांव ते अंजाळे रस्ता दुरुस्तीची मनसेची मागणी !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- तालुक्यातील यावल ते भुसावळ दरम्यानचा राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यंतच्या रस्त्याला अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे. त्या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने रस्ता दुरुस्त करावे अशी निवेद्वारे मागणी केली आहे. हे रस्ते ग्रामीण भागातील लोकांसाठी दळणवळनाच महत्त्वाच साधन आहेत. चाळण झालेल्याला रस्त्यावर ये-जा करताना ग्रामीण भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अन्यथा सदर रस्त्यावर एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. वरील संभाव्य शक्यताची भीषणता लक्षात घेऊन सदर भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेने केली आहे. लोकप्रतिनिधीनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने वरिष्ठ पातळीवर या रस्त्याची दक्षता घेऊन तत्वरी या मार्गावरील रस्त्याची गुणवत्तापूर्व चांगल्या प्रकाराची दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. आठ दिवसाच्या आत रस्ता दुरुस्ती न झाल्यास मनसेकडून रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देखील मनसेने दिला आहे. निवेदनाप्रसंगी चेतन अढळकर , अजय तायडे, किशोर नन्नवरे, श्याम पवार ,गौरव कोळी ,प्रतिक भंगाळे मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.