जात पडताळणीतील त्रुटींच्या पुर्ततेसाठी 17 व 18 जानेवारी रोजी शिबिर – योगेश पाटील

0

नंदुरबार, दि.15 – (जिमाका वृत्त) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ज्यांचे जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 17 व 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलारोड नंदुरबार येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती योगेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.