प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदान दिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जात असून यानिमित्त यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन प्र.प्राचार्या .डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.यासाठी महाविद्यालयात मतदार साक्षरता मंडळ तयार करण्यात आले असून या मंडळाचे नोडल अधिकारी प्रा.संजय डी.पाटील यांच्या वतीने घोषवाक्य व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए. पी.पाटील,प्रा.एम.डी. खैरनार, प्रा.डॉ.आर.डी. पवार,प्रा.एच.जी.भंगाळे,प्रा.मनोज पाटील,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.संतोष जाधव, प्रा.कामडी प्रा.पी.व्ही. पावरा सर,प्रा.प्रतिभा रावते इ. उपस्थित होते.यात एकूण २६ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यातील निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक- नयना संजय बारी, द्वितीय क्रमांक- दीपाली प्रमोद ढाके व तृतीय क्रमांक- जयश्री संजय सोळंके ह्या विद्यार्थिनींनी मिळविला तर घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक-जयश्री नारायण धनगर, द्वितीय क्रमांक- स्वाती संजय बाविस्कर व तृतीय क्रमांक- संध्या समाधान कोळी ह्या विद्यार्थिनींनी मिळविला.