प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळावी म्हणून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयात टाय -डे व साडी- डे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात वेगवेगळा गणवेश पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व इतर स्पर्धेत सहभागी राहून मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. पोस्टर स्पर्धेत विद्यार्थिनी गटात कु.ज्ञानेश्वरी प्रमोद चौधरी ( प्रथम क्रमांक) तर कु.विजया संजय पाटील ( द्वितीय क्रमांक) रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनी गटात कु.तेजश्री सुनील कोलते ( प्रथम क्रमांक) तर कु. विजया संजय पाटील ( द्वितीय क्रमांक) संगीत खुर्ची स्पर्धेत विद्यार्थिनी गटात कु.सारिका दिलीप अढायगे (प्रथम क्रमांक) तर कु. नंदिनी समाधान पाटील ( द्वितीय क्रमांक)
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थिनी गटात कु. सानिका एकनाथ सावकारे ( प्रथम क्रमांक) तर कु.रोशनी कैलास पाटील ( द्वितीय क्रमांक) मेहंदी स्पर्धेत विद्यार्थिनी गटात कु. स्वाती संजय बाविस्कर ( प्रथम क्रमांक) तर नयना संजय बारी ( द्वितीय क्रमांक) रिल व्हीडिओ स्पर्धेत विद्यार्थी गटात कु.सचिन राजू बारी ( प्रथम क्रमांक) तर समाधान बापू पाटील ( द्वितीय क्रमांक) फॅन्सी ड्रेस स्पर्धात विद्यार्थी गटात कु. सचिन राजू बारी ( प्रथम क्रमांक) तर कु. समाधान बाळू पाटील ( द्वितीय क्रमांक) क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व प्रकारच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या व प्रथम व द्वितीय क्रमांकाचे प्राविण्य मिळवलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी अभिनंदन केले व मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेत असतानांच महाविद्यालयातील पुस्तकी अभ्यासक्रमाबरोबरच कोणतीही लाज न बाळगता सहशालेय उपक्रमामध्ये सहभागी होऊन स्थान प्राप्त केले पाहिजे जेणेकरून आपल्या सुप्त गुणांना संधी मिळू शकते. यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. अर्जुन पाटील कनिष्ठ विभागाचे उप प्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. कुंदन फेगडे ( यावल)डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. सुधीर कापडे, डॉ. आर. डी.पवार, डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. अरुण सोनवणे, प्रा. मुकेश येवले, प्रा. एकनाथ सावकारे, प्रा. संजीव कदम, प्रा. चिंतामण पाटील, प्रा.राजेंद्र थिगळे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य डॉ. संतोष जाधव, प्रा. प्रतिभा रावते, प्रा. रजनी इंगळे, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. अर्जुन गाढे, प्रा. सुभाष कामडी, प्रा. छात्रसिंग वसावे, प्रा.डॉ.निर्मला पवार, डॉ.वैशाली कोष्टी, प्रा. प्रशांत मोरे, श्री. मिलिंद बोरघडे, श्री. प्रमोद कदम, श्री. प्रमोद जोहरे, श्री. अमृत पाटील, श्री. प्रमोद भोईटे यांनी परिश्रम घेतले.