यावल महाविद्यालयात क्रीडा विभागांतर्गत विविध स्पर्धा संपन्न !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे कनिष्ठ क्रीडा विभागांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन प्र प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी केले. उपप्राचार्य प्रा एम.डी. खैरनार उपप्राचार्य ए. पी. पाटील उपप्राचार्य प्रा संजय पाटील उपस्थित होते. लांब उडी स्पर्धेत मुलींमध्ये मध्ये प्रथम वैशाली पाटील. द्वितीय जागृती सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. मुलांमध्ये प्रथम दानीश तडवी यश प्राप्त केले या स्पर्धेत २० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. गोळा फेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम विवेक पाटील द्वितीय अर्जुन पावरा तर मुलींमध्ये प्रथम सारिका अढायगे द्वितीय सानिया तडवी या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले या स्पर्धेत १५ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. भाला फेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम विवेक पाटील द्वितीय कृष्णा कंठाळे तर मुलींमध्ये प्रथम नंदिनी महाजन द्वितीय सपना भिलाला या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले या स्पर्धेत २२ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. थाळीफेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम विवेक पाटील द्वितीय अर्जुन पावरा मुलींमध्ये प्रथम नंदिनी महाजन द्वितीय सपना भिलाला या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले या स्पर्धेत ३२ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. १०० मीटर धावणे स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम कजीमा तडवी द्वितीय हेमांगी पाटील या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत १५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. २०० मीटर धावणे मुलींमध्ये प्रथम सारिका अढायगे द्वितीय मोहिनी भालेराव तर मुलांमध्ये प्रथम मयूर पाटील द्वितीय वंश येवले या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले या स्पर्धेत २५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सी. के. पाटील प्रा. ए.जी. सोनवणे प्रा. एम. एच.पाटील.प्रा आर. एस. तडवी प्रा. इ.आर. सावकार प्रा. एम.पी. येवले प्रा.एस.व्ही कदम प्रा.आर. एस. थिगळे यांनी काम पाहिले.