तरुणांनी सोशल मीडियाचा अतिवापर करणे टाळावे – मयुर महाजन

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवाळी श्रम संस्कार शिबिर दत्तक गाव चितोडे येथे चालू असून आज चौथा दिवस सकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी गावातून बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाची रॅली काढून जनजागृती केली व पथनाट्य सादर केले. दुपारच्या सत्रात श्री. मयुर महाजन ( राजुरा) यांनी त्यांच्या पंधरा वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेत केलेल्या कार्याला उजाळा देताना वेगवेगळ्या अनुभव सांगताना श्रमसंस्कार शिबिर हे देशातील तरुणायला कर्तव्यशील नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे ह्या शिबिरातून तरुणाई मध्ये कामाचा उत्साह निर्माण होतो परंतु आजची तरुण पिढीचे भवितव्य सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानामध्ये गुरफटत चाललेले आहे. असे महाजन यांनी सांगितले ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मोबाईल सारखी तर तंत्रज्ञानाची व्यवस्था विद्यार्थी 18 तास वापरत असल्यामुळे व्हाट्सअप, फेसबुक चॅटींग इंस्टाग्राम, ह्याचा नको त्या कामासाठी अतिवापर होत असल्यामुळे तरूणाई भरकटत चालली आहे शक्यतो ते टाळायला हवे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कु.श्रद्धा निकम यांनी केले तर आभार डिंपल अहिरे हिने मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. डी. पवार, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली कोष्टी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी श्री.अमृता पाटील कु.वेदांत माळी कु.मनोज बारेला कु.साहिल तडवी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.