पशु ॲम्बुलन्स तात्काळ सुरू करा गोवर्धन गौशाळेचे अध्यक्ष गोपाळ कोळी यांचे मा.खासदार रक्षा खडसे यांना निवेदन !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला ८० पशु ॲम्बुलन्स सुपुर्द केलेल्या आहेत तरी ही ॲम्बुलन्स १९६२ या हेल्पलाईन नंबर ने चालते मात्र अद्यापही महाराष्ट्राकडे या गाड्या येऊन फार वेळ झाला परंतु अजुनही पशु ॲम्बुलन्स सुरु केलेल्या नाहीत तरी लवकरच पशु ॲम्बुलन्स सुरू कराव्या या आशयाचे निवेदन गोवर्धन गौशाळेचे अध्यक्ष गोपाळ कोळी, निमगाव यांच्यासह गौसेवकांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना दिले आहे. या गाड्या चालु झाल्यामुळे पशु स्वास्थ मध्ये सुधार होईल त्याचा फायदा अवघ्या महाराष्ट्राला होईल आणि रोजगार पण वाढेल. तरी आपणास विनंती की, उचित आदेश देऊन सगळ्याच गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या ही विनंती निवेदन देताना गोवर्धन गौशाळेचे स्वस्थापक अध्यक्ष गोपाळ भावलाल कोळी, अरुण एकनाथ तावडे,भरत गोकुळ कोळी, रमेश लोहार आदी उपस्थित होते.