प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर दत्तक गाव चितोडा येथे सुरू आहे. चौथ्या दिवशी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. सकाळच्या सत्रात शिबिरातील स्वयंसेवकांनी “एक मूठ धान्य संकलन” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवताना गट निहाय गावातील नागरिकां कडे घरोघरी आपुलकीने स्वयंसेवकांनी धान्य मागणी केली. प्रत्येक घरातून गहू, तांदूळ, ज्वारी, पैसे आदि गावकऱ्यांनी मोठ्या आनंदी भावनेने दिले. सकाळच्या दुसऱ्या सत्रात स्वयंसेवकांनी गावातून एड्स (HIV) जनजागृती रॅली काढली. रॅली दरम्यान पथनाट्य सादर केले. यावेळी गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
दुपारच्या बौद्धिक सत्रात श्री. वसंतकुमार संदानशीव (समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय यावल) यांनी विद्यार्थ्यांना एच. आय. व्ही. (एडस) विषयावर मार्गदर्शन करताना,
एड्स हा मानवनिर्मित पसरणारा आजार आहे. त्यापासून सावध राहायला हवे असे आवाहन केले. श्री. पवन जगताप यांनी सिकल सेल आजार बाबत प्रतिबंध, उपाय व उपचार या विषयावर मार्गदर्शन करताना रेड रीबन क्लबची माहिती दिली. शिबीरात बहुसंख्य स्वयंसेवकांनी एड्स चाचणी करून प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली कोष्टी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, वेदांत माळी, मनोज बारेला, साहिल तडवी यांनी परिश्रम घेतले.