मराठी भाषा संबंधित गैरसमज दूर करा – डॉ. नरेंद्र महाल

0

प्रतिनिधी, , दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोप कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार, प्रा. ए.पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नरेंद्र महाले यांनी मार्गदर्शन करताना मराठी भाषेवरील गैरसमज सर्वांनी दूर करायला हवा, माणसाचे मन चंचल आहे. मराठी भाषेवर इतर भाषेचा प्रभाव पडलेला आहे. भाषा दर बारा कोसावर बदलते, त्यामुळे बोलींचे संवर्धन होत जाते. परंतु मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देह बोली जपणे महत्त्वाचे आहे. असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. परंतु महाराष्ट्रात तिची जागा इतर भाषांनी,बोलींनी घेतली आहे. परंतु मराठीला पहिले प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुभाष कामडी यांनी केले व आभार डॉ. संतोष जाधव यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. मयूर सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.नरेंद्र पाटील, प्रा. प्रशांत मोरे, प्रा.मिलींद मोरे, प्रा.अर्जुन गाढे, प्रा.अक्षय सपकाळे, प्रा. नंदकिशोर बोधडे, प्रा. प्रतिभा रावते,श्री. मिलिंद बोरघडे, श्री. साहेबराव आहेर यांनी परिश्रम घेतले.