यावल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न !

0

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व द्विपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध पदावर कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा बाबत भूमिका विशद केली. एम. के. पाटील (मुख्याध्यापक साने गुरुजी विद्यालय यावल) यांनी प्रथम मनोगत व्यक्त करतांना मनोगत व्यक्त केले की संस्कार ही विद्येची देवता आहे. लक्ष्मी ही धनाची देवता आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन आणि इतर ठिकाणी भरकटत न फिरता शिक्षण घेऊन संस्कारशील गुण अवगत करणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाप्रसंगी महेंद्र पाटील (कार्यरत लष्कर अधिकारी), महेश वाणी (बालसंस्कार विद्यालय चेअरमन) डॉ. हेमंत येवले (ग्रंथपाल, नूतन मराठा महाविद्यालय जळगाव), ॲड. सुनील वाणी, आय्युब खान (मुख्याध्यापक डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व जुनिअर महाविद्यालय यावल), श्री.अविनाश पाटील, श्री. सुधाकर गजरे (शिक्षण विस्तार अधिकारी), इफ्तेखार खान, प्रा.मुकेश येवले, ह्यांनी अनुभव सांगितले व मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की यावल महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध विभागात वेगवेगळ्या पदांवर नोकरी व व्यवसाय करीत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. हा उर भरून येणारा महाविद्यालयातील क्षण आहे. मागील ४० वर्षांपासून गोरगरीब वंचित, ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ज्ञान गंगा पोहचवण्यासाठी काम करीत आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये नोकरी अथवा व्यवसाय करीत आहेत, त्यारूपी महाविद्यालयाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपली यशस्वी वाटचाल ही महाविद्यालयाची गुणवत्तेची पावती आहे, यातून मूल्य शिक्षण महत्त्व सिध्द होत आहे असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला आय्युब पटेल, अमोल भिरुड, प्रा. संजीव कदम, शेखर पटेल ॲडव्होकेट . देवकांत पाटील, प्रमोद पाटील , सुनील साठे, पवन पाटील, कैलास माळी, विलास बारी, महेश अहिरे, अॅड. निलेश मोरे, वसीम खाटीक, अॅड. अशोक सुरळकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास शक्य तेवढे सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील, डॉ. आर. डी. पवार, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ.पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा.राजू तडवी, प्रा.चिंतामण पाटील, प्रा. अरूण सोनवणे, प्रा.सुभाष कामडी, प्रा.राजेंद्र थिगळे, डॉ. संतोष जाधव, प्रा. सि. टी. वसावे, डॉ.वैशाली कोष्टी, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.अर्जुन गाढे, प्रा.प्रशांत मोरे , मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले, तर आभार डॉ. सुधीर कापडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयात शिक्षण घेतलेले १०७ माजी विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.