जळगाव तहसील कार्यालयाचा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार !

0

जळगाव:- तहसील कार्यालयाचा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार सुरू असून जिल्हा प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या ई- टपालाद्वारे प्राप्त पत्रावर आठ महिन्यापासून कारवाई नाही संबंधित विभागाला याबाबत विचारणा केली असता. जिल्हा पुरवठा विभागाकडून याबाबत पत्र प्राप्त नाही असे सांगितले जाते तक्रादारांची गैरसोय होत असून या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण असा प्रश्न? सर्वसामान्यांना पडला आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे तसेच प्राप्त तक्रार अर्जावर शासकीय नियमानुसार कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने शास्तीची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्यूरोचे जिल्हा उपाध्यक्ष एम एम कोळी यांनी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.