प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन साहसी अभियान कार्यशाळेचे पहिले पुष्प. डॉ.वैशाली रुपेश निकुंभ वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय यावल यांनी गुंफले. स्री आरोग्य विषयक जागृती समस्या या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थिनींना केले . आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला तसेच उपप्राचार्य एम डी खैरनार उपप्राचार्य ए पी पाटील सर तसेच डॉ.एस पी कापडे सर डॉ. हेमंत भंगाळे सर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ एस पी कपडे सरांनी केले सूत्रसंचालन प्रा. रजनी इंगळे व आभार युवती सभा प्रमुख डॉ. निर्मला पवार मॅडम यांनी केले .