यावल:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन साहसी अभियान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. कार्यशाळेचे दुसरे पुष्प. श्री गोपाल जोनवाल व सौ प्रेमलता जोनवाल यांनी गुंफले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कराटे व संरक्षण यावर रात्री बे रात्री मुलींवर होणारे अन्याय अत्याचार याविषयी घाबरून न जाता साहस केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जागृती समस्या या विषयावर त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी .पाटील होते.उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार तसेच डॉ.एस. पी.कापडे, डॉ. हेमंत भंगाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. एस. पी. कापडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती सभा प्रमुख डॉ. निर्मला पवार यांनी केले. आभार तेजश्री कोलते या विद्यार्थिनीने मानले .कार्यक्रमाला प्रा. सी टी वसावे प्रा. सुभाष कामडी, प्रा. मिलिंद मोरे प्रा. रजनी इंगळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. मिलिंद बोरघडे, श्री. प्रमोद भोईटे, श्री. प्रमोद कदम, श्री. दुर्गादास चौधरी यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.